पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धुळ्यात युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार नाटकाला विरोध; पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले

इमेज
  एल्गार मराठी न्यूज   धुळे प्रतिनिधी : दि. 5 जुलै 2026 : धुळे शहरातील हिरे भवन येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' या नाटकाच्या प्रयोगास भारतीय संविधान सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत विरोध केला. नाटकाचा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न करत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. यापूर्वी, दि. 4 जुलै 2026 रोजी भारतीय संविधान सेनेच्या वतीने धुळे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ लावण्यात आलेले 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' नाटकाचे माहिती फलक फाडण्यात आले होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि संबंधित नाटकाचा निषेध करत हे नाटक धुळ्यात होऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर रविवारी नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी भारतीय संविधान सेनेचे अध्यक्ष आनंद लोंढे, आबासाहेब अमृत सागर, रवी पवार, भाऊसाहेब बळसाने यांच्यासह कार्यकर...

एमआयएमची धुळे शहर व जिल्हा कार्यकारिणी घोषित; सोशल इंजिनिअरिंगवर भर

इमेज
एमआयएमची धुळे शहर व जिल्हा कार्यकारिणी घोषित; सोशल इंजिनिअरिंगवर भर एल्गार मराठी न्यूज  धुळे, प्रतिनिधी : बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या निर्देशानुसार ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची धुळे शहर व धुळे जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत रियाज अली शेख यांची जिल्हाध्यक्ष, शोएब अन्सारी यांची शहराध्यक्ष, तर सोशल इंजिनिअरिंगचा भाग म्हणून सनी संजय वाडेकर यांची जिल्हा युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे एमआयएम हा सर्वधर्म समभावाची भूमिका स्वीकारणारा तसेच जात-पात न मानता सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देणारा पक्ष असल्याचे स्पष्ट होते, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. नव्याने नियुक्त करण्यात आलेले सर्व पदाधिकारी पक्ष कार्यालयात नियमित उपलब्ध राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहतील, असेही यावेळी नमूद करण्यात आले. धुळे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षाचे ११ नगरसेवक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसोबत समन्वयाने काम करतील. शहराच्या विकासाबाबत तसेच सामाज...

शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; ९ जुलै रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन!

इमेज
प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाचा इशारा एल्गार मराठी न्यूज  धुळे प्रतिनिधी :   धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाला निवेदन सादर करत ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी, धुळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. समितीच्या निवेदनानुसार, पदोन्नती प्रक्रियेत होत असलेला विलंब तातडीने दूर करून प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, कार्यरत सेवाज्येष्ठ शिक्षकांना TET पात्रतेत शिथिलता देण्यात यावी किंवा अनुभवाच्या आधारे समकक्ष पात्रता देण्याचा निर्णय घ्यावा, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत पदोन्नतीस पात्र शिक्षकांना संधी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, शाळा संलग्नीकरण धोरणामुळे ग्रामीण भागातील शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणा...

धुळे शहराला लाभले आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

इमेज
धुळे शहराला लाभले आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न  एल्गार मराठी न्यूज   धुळे, प्रतिनिधी : धुळे शहरातील देवपूर परिसरातील पांझरा नदीकाठी, हत्ती डोहाजवळील चामुंडामाता नगर येथे उभारण्यात आलेल्या आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडामाता मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे गुरुवार (दि. २) ते रविवार (दि. ५ जुलै २०२६) या कालावधीत अत्यंत भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्ट, धुळे यांच्या वतीने आयोजित या चारदिवसीय धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. ट्रस्टचे अध्यक्ष श्री. पंढरीनाथ राजाराम बडगुजर यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांनी मंदिरासाठी स्वतःच्या मालकीची जागा दान दिल्यानंतर हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. धुळे शहरात प्रथमच आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर साकार झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोहळ्याची सुरुवात गुरुवारी सकाळी वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक (स्वस्तिक सिनेमा) येथून निघालेल्या भव्य कलश शोभायात्रेने झाली. त्यानंतर तीन दिवस वे...

जागतिक महिला दिनानिमित्त डिजिटल प्रेस क्लब इंडिया द्वारा आयोजित ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’ सोहळा संपन्न

इमेज
    जागतिक महिला दिनानिमित्त डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया व मातृशक्ती संतोषी फाउंडेशन च्या वतीने आयोजित ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’   कार्यक्रम मलकापूर येथील  भातृ मंडळ येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला .  आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया व मातृशक्ती संतोषी फाउंडेशन च्या वतीने  जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील  कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होतेत्यावेळी  782 प्रस्तावांपैकी निवड करून 219  मान्यवरांना ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’    प्रदान करण्यात आला. यामधे  शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणाऱ्या  महिला शिक्षक, डॉक्टर, आषा सेविका, परिचारिका, यांना  सुद्धा ‘डायनॅमिक इंडिया ...