शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागात महत्त्वाच्या नियुक्त्या; अंबादास लष्करे जिल्हा उपाध्यक्ष, कपिल सोसे शहराध्यक्ष

 


प्रदेशाध्यक्ष अँड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती; शिवसेना संघटन बळकटीसाठी जबाबदारी


एल्गार मराठी न्यूज 


मुंबई | शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागात महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या असून, आहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी अंबादास लष्करे यांची, तर छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदी कपिल सोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे राज्य संपर्क प्रमुख अनिल धमने पाटील आणि सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.


प्रसिद्धीपत्रकानुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रशांत पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, ओबीसी नेते तथा शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष अँड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


प्रदेशाध्यक्ष अँड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून, त्यामध्ये शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रिय प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शिवसेना वाढविण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


या नियुक्तीनंतर राज्यभरातील शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या