भूषण भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार पडताळणीसाठी जनजागृती; उर्वरित नागरिकांना तातडीने SIR प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
एल्गार मराठी न्यूज
धुळे | प्रतिनिधी
शिवसेना पक्षाच्या वतीने आणि सामाजिक कार्यकर्ते भूषण भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १८ मध्ये SIR (Special Intensive Revision) प्रक्रिया २०२६ अंतर्गत मतदार पडताळणी, जनजागृती व नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत SIR प्रक्रिया पूर्ण केली.
भारतीय निवडणूक प्रक्रियेत SIR ही मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. या प्रक्रियेद्वारे मतदार यादीतील माहिती अद्ययावत केली जाते, चुकीच्या नोंदी दुरुस्त केल्या जातात, नव्याने पात्र ठरलेल्या नागरिकांची नावे समाविष्ट केली जातात तसेच मृत, स्थलांतरित किंवा अपात्र व्यक्तींच्या नोंदींची छाननी केली जाते. परिणामी मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व विश्वासार्ह बनते आणि प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा घटनात्मक अधिकार बजावता येतो.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजे द बॉस ग्रुप, धुळे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन केले. कागदपत्रांची पूर्तता, अर्ज भरणे आणि पडताळणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शिवसैनिकांनी व राजे द बॉस ग्रुप च्या स्वयंसेवकांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी नगरसेविका मंगला ताई सोनवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते भूषण भाऊ ठाकरे यांनी उपस्थित नागरिकांचे, शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे आणि राजे द बॉस ग्रुपच्या सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १८ मधील सदिच्छा नगर, गोकुळनगर, गौरीशंकर हौसिंग सोसायटी, भाईजी नगर, चक्कर बर्डी, एमआयडीसी (MIDC), मोहाडी आणि अवधान या भागांमध्येही लवकरच SIR प्रक्रिया २०२६ अंतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागांतील ज्या नागरिकांनी अद्याप SIR प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच SIR प्रक्रियेबाबत अधिक माहिती, शिबिराचे ठिकाण, वेळ किंवा आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन हवे असल्यास नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण भाऊ ठाकरे (मो. +918308343555) यांच्याशी संपर्क साधून आपली SIR प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मतदार यादीत नाव अचूक राहण्यासाठी आणि भविष्यात मतदानाचा अधिकार विनाअडथळा बजावता यावा, यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.


0 टिप्पण्या