एल्गार मराठी न्यूज
मुंबई प्रतिनिधी : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही अवाजवी खर्च न करता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविला.
संजय कुसळकर यांचा ७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांनी पालघर जिल्ह्यातील वैती गावात वृक्षारोपण केले. यावेळी लहान मुलांना मिठाईचे वाटप करून साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
या उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत उत्सवी कार्यक्रमांवर अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहनही या माध्यमातून करण्यात आले.
या विधायक उपक्रमाला शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे राज्य संपर्कप्रमुख अनिल धमने पाटील, शिवसेना ओबीसी/व्हीजेएनटीचे पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे तसेच मनीषा सचिन धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि बालकांना मिठाई वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल संजय कुसळकर यांच्या या उपक्रमाचे वैती गावातील नागरिक तसेच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून कौतुक होत आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच समाजाभिमुख कार्याला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम इतरांसाठीही आदर्श ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


0 टिप्पण्या