अधिष्ठाता डॉ. अजित पाठक यांचा संविधान संरक्षण समितीतर्फे सत्कार



 हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, रुग्णसेवा आणि प्रशासकीय कामकाजावर चर्चा

एल्गार मराठी न्यूज 


धुळे : शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातापदी डॉ. अजित पाठक यांची नियुक्ती झाल्याबद्दल संविधान संरक्षण समितीतर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


संविधान संरक्षण समितीचे संस्थापक प्रमुख श्री. हरिश्चंद्र आण्णा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. पाठक यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


सत्कारानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. पाठक यांच्याशी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, रुग्णसेवा तसेच प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.


या प्रसंगी कॉम्रेड एल. आर. राव, राजेंद्र अहिरे, बी. बी. वानखेडे, किशोर शेजवळ, महाराष्ट्र सुरक्षा बल प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर सोनवणे, एम. एच. मोहिते, सब-इन्स्पेक्टर मिलिंद जोशी (मालेगाव), दीपक सोनवणे, राजेंद्र चौधरी, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते.


नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अजित पाठक यांनी महाविद्यालयाच्या कामकाजात सकारात्मक बदल घडवून आणावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या