राजकीय व सामाजिक कार्याची दखल; शिवसेनेकडून महत्त्वाची जबाबदारी
एल्गार मराठी न्यूज
मुंबई |शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या नागपूर शहराध्यक्षपदी विजय कामडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रशांत पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी नेते तथा शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली विजय कामडी यांना नियुक्तीपत्र देऊन नागपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
विजय कामडी यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष ॲड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात, वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रिय प्रचार-प्रसार करावा, तसेच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करावे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीनंतर विजय कामडी यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्य संपर्क प्रमुख अनिल धमणे पाटील, सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

0 टिप्पण्या