शेकडो दिव्यांगांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन; जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी स्वतः खाली येऊन स्वीकारले निवेदन



"धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी स्वतः खाली येऊन दिव्यांग बांधवांकडून स्वीकारले निवेदन" 

एल्गार मराठी न्यूज

धुळे | प्रतिनिधी


महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे हजारो दिव्यांग महिला-पुरुषांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी मा. भाग्यश्री विसपुते यांना निवेदन देण्यात आले.


या वेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांगांची मोठी उपस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मा. भाग्यश्री विसपुते या आपल्या कॅबिनमधून स्वतः खुर्चीवरून उठून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीखाली आल्या आणि दिव्यांग बांधवांजवळ जाऊन त्यांच्याकडून निवेदन स्वीकारले. त्यांच्या या संवेदनशील आणि सकारात्मक भूमिकेचे उपस्थित दिव्यांगांनी स्वागत केले.


सदर निवेदनात दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य, प्रवास, आर्थिक सहाय्य, शासकीय योजनांचा प्रभावी लाभ तसेच इतर विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या