धुळे–पुणे स्वतंत्र रेल्वे तातडीने सुरू करा; 'मी धुळेकर' संघटनेचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन
एल्गार मराठी न्यूज
धुळे प्रतिनिधी : जिल्हा , नंदुरबार जिल्हा , तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर , पारोळा , परिसरातून दररोज हजारो नागरिक विद्यार्थी वर्ग , नौकारदार वर्ग , व्यापारी वर्ग विविध कामानिमित्त व खूपशे नागरिक वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला येजा करत असतात . नरडाणा व धुळे MIDC येथे मागील काही वर्षात बरेच उद्योग वाढले आहेत त्यासाठी सुद्धा कंपन्यांच्या कामासाठी प्रवाशांची संख्या वाढली आहे . यासाठी सध्या परिस्थितीत बसेस व खाजगी वाहनांद्वारे नागरिक प्रवास करतात . जो खूपशा नागरिकांना परवडणारा नसतो . कोव्हीड -१९ साथीच्या अगोदर धुळे ते पुण्यासाठी दोन बोग्या सुरुही केल्या होत्या , परंतु कोव्हीड -१९ च्या साथीमुळे त्या बंद करण्यात आल्या . त्यावेळी त्या बोग्यांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता . धुळे मुबई स्वतंत्र रेल्वेला चांगला प्रतिसाद आहे त्याच धर्तीवर धुळे -पुणे रेल्वेला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
धुळे जिल्ह्याची वाढणारी लोकसंख्या तसेच संपूर्ण जिल्ह्यातून धुळे – पुणे येजा करणाऱ्या प्रवाशांचा ओघ बघता स्वतंत्र रेल्वे सुरु करण्याची गरज आहे .
त्याजोगे रेल्वे चा फायदा जिल्हा व संपूर्ण खांदेश पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना होईल . व या धुळे – पुणे – धुळे रेल्वेला प्रवाश्यांद्वारे चांगला प्रतिसादही मिळेल .
ही रेल्वे सुरु झाल्यामुळे धुळे स्टेशन परिसरात रो7जगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व धुळे शहर व जिल्ह्यातील उद्योगालाही चालना मिळेल .
म्हणून धुळे – पुणे – धुळे स्वतंत्ररेल्वे लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी केंदीय रेल्वे मंत्री मा. ना. अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवून/ देऊन (हस्ते उपजिल्हा अधिकारी प्रशासन संदीप पाटील) मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली.
यावेळी मी धुळेकर चे अध्यक्ष निरंजन भतवाल, छोटू भाऊ पोतदार, दिनेश वाघ , फरदिन शेख, आफ्रिदी शेख, सलमान पठाण उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा