लोकशाहीचा विश्वास घराघरांत... जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते स्वतः पोहोचल्या मतदारांच्या दारात




 विशेष सखोल पुनरीक्षण प्रत्यक्ष पाहणी; नागरिकांशी संवाद साधत शंकांचे निरसन, अचूक मतदार नोंदणीसाठी सहकार्याचे आवाहन

एल्गार मराठी न्यूज

धुळे प्रतिनिधी : लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार यादीतील प्रत्येक नाव अचूक आणि अद्ययावत असावे, यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी धुळे शहरातील नटराज चित्रपटगृह परिसर व शांतीनगर भागात प्रत्यक्ष घरभेटी देत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेची पाहणी केली. सहकारी अधिकाऱ्यांच्या सो एल्गार मराठी न्यूज धुळे : लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार यादीतील प्रत्येक नाव अचूक आणि अद्ययावत असावे, यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी धुळे शहरातील नटराज चित्रपटगृह परिसर व शांतीनगर भागात प्रत्यक्ष घरभेटी देत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेची पाहणी केली. सहकारी अधिकाऱ्यांच्या सोबत पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या शंका जाणून घेतल्या आणि प्रत्येक मतदाराची नोंद अचूक असणे हीच सक्षम लोकशाहीची खरी ताकद असल्याचा संदेश जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी यावेळी दिला. बत पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या शंका जाणून घेतल्या आणि प्रत्येक मतदाराची नोंद अचूक असणे हीच सक्षम लोकशाहीची खरी ताकद असल्याचा संदेश जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी यावेळी दिला.

धुळे : लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार यादीतील प्रत्येक नाव अचूक आणि अद्ययावत असावे, यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी धुळे शहरातील नटराज चित्रपटगृह परिसर व शांतीनगर भागात प्रत्यक्ष घरभेटी देत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेची पाहणी केली. सहकारी अधिकाऱ्यांच्या सोबत पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या शंका जाणून घेतल्या आणि प्रत्येक मतदाराची नोंद अचूक असणे हीच सक्षम लोकशाहीची खरी ताकद असल्याचा संदेश जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी यावेळी दिला.


भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी विसपुते यांनी मतदार यादीतील नाव, पत्ता व इतर तपशील अद्ययावत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि पडताळणीसंदर्भातील अडचणी यांची सविस्तर माहिती नागरिकांकडून जाणून घेतली. त्यांनी नागरिकांच्या अडचणींचे तत्काळ निरसन करत घरभेटीस येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी परिसरातील काही तरुणींनी भरलेले एन्युमरेशन फॉर्म जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे सुपूर्द केले.


पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदार पडताळणीचे काम अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक जनगणना पत्रकावर घरगणना क्रमांक व मॅपिंगची नोंद करावी, तसेच पुढील दोन दिवसांत शंभर टक्के काम पूर्ण करून माहिती तातडीने अपलोड करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.


या पाहणीवेळी अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, अपर तहसीलदार वैशाली हिंगे, नगरसेवक प्रतीक कर्पे, छोटू थोरात, माजी महापौर प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, मतदार नोंदणी अधिकारी किशोर कदम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; ९ जुलै रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन!

एमआयएमची धुळे शहर व जिल्हा कार्यकारिणी घोषित; सोशल इंजिनिअरिंगवर भर

धुळे शहराला लाभले आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न