टीईटीसह प्रलंबित प्रश्नांवर शिक्षक आक्रमक; धुळ्यात सरकारविरोधात एल्गार
एल्गार मराठी न्यूज
धुळे प्रतिनिधी, दि. ९ जुलै : महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गुरुवारी (दि. ९) आयोजित राज्यव्यापी 'शाळा बंद – सामूहिक रजा' आंदोलनाला धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी शंभर टक्के शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला.
धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या विराट आक्रोश मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. तसेच क्यूमाईन क्लब येथे धरणे आंदोलनही करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी सेवेत कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्ती रद्द करणे, दि. १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द अथवा सुधारित करणे, बीएलओचे काम शिक्षकांऐवजी इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडे सोपविणे, टीईटी व सीटीईटी संदर्भातील दि. १४ मे २०२६ चे पत्र मागे घेणे, शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे तसेच टीईटी प्रकरणी शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा २०१३ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना कायद्यातून सूट देण्याची तरतूद करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या.
शासनाने शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, कार्याध्यक्ष रविंद्र का. पाटील, शिवानंद बैसाने, बाळासाहेब बोरसे, शरद सूर्यवंशी, विजय खैरनार, संजय पोतदार, भूपेश वाघ, राजेंद्र नांद्रे, संजय शिंदे, विनोद पाटील, प्रविण भदाणे, रविंद्र बोरसे, बापू पारधी, मुरलीधर शिंदे, नवीनचंद्र भदाणे, राजेंद्र भामरे, मिलिंद वसावे, जगदीश बडगुजर, ज्ञानेश्वर पवार, विजय ढोबळे, शरद पवार, विजयकुमार देसले, कमलाकर बच्छाव, रुपेश जैन, ज्ञानेश्वर कंखर, गमन पाटील, नाजीम मिर्झा, गोकुळ सोनार, मनोज निकम, छोटू राजपूत, संदीप पवार, शामकांत अहिरराव, पंडीत पाटील, विश्वनाथ सोमवंशी, प्रभाकर मेटकर, सुरेंद्र पिंपळे, शरद पाटील, ऋषिकेश कापडे, गिरीश बागुल, संदीप मराठे, संदीप नेरे, अनिल तोरवणे, ईश्वर ठाकरे, तुकाराम बहिरम, गजानन जाधव, दत्तात्रय पाटील, नितीन सासके, अशोक बडगुजर, संतोष जाधव, अविनाश काकुळदे, भुषण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर, विलास पाटील, राकेश केदार, धर्मसिंग पावरा, विशाल परदेशी, रविंद्र पवार, भास्कर परदेशी, वंदना सावंत, तृप्ती राजूरकर, ज्योती वराडे, रखमा पाटील, रुपाली सोनवणे, ज्योत्स्ना सनेर, छाया परदेशी, पल्लवी मांडोळे, दीपाली पवार, प्रतिभा वाघ, दीपा मोरे, चेतना परदेशी आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा