भूषण माळीविरोधातील कारवाईनंतर आदिवासी भील समाज आक्रमक; निष्पक्ष चौकशी व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी
एल्गार मराठी न्यूज
धुळे|प्रतिनिधी: धुळे, दि. ११ जुलै : कालीकानगर, गोळीबार टेकडी व परिसरातील समस्त आदिवासी भील समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन एका प्रकरणात अनुसूचित जमातीवरील अत्याचार झाल्याचा आरोप करत संबंधितांवर भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, निम्लाबाई अनिल माळी या अनुसूचित जमातीतील (भील) असून त्या कालीकानगर परिसरात वास्तव्यास आहेत. ५ जुलै २०२६ रोजी त्यांच्या मुलगा भूषण याचा शेजारील कुटुंबासोबत किरकोळ वाद झाला. हा वाद सुरू असताना संबंधितांकडून निम्लाबाई व त्यांच्या मुलाला जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्याच दिवशी दुपारी संबंधित कुटुंबातील १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित चिठ्ठीत भूषणचे नाव नमूद नसतानाही त्याच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच भूषण व मृत मुलगी यांच्यात कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध नव्हते, असाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.
घटनेनंतरही संबंधित व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांकडून निम्लाबाई यांच्या कुटुंबाला वारंवार जातिवाचक शिवीगाळ, धमक्या देणे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच निम्लाबाई माळी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी समस्त आदिवासी भील समाजाने प्रशासनाकडे केली आहे.
सदर निवेदनावर अनिल माळी, निर्मला माळी, रोहित माळी, अनिता मोरे, शशिकांत मोरे, योगिता पवार, मनोज मोरे, दुर्गा धुळेकर, निलेश धुळेकर, आशाबाई पवार, प्रीती मोरे, विजू मोरे, सनी पवार, अभिषेक महिरे, वामन मोरे, राज मोरे, अरुणा पवार, अनिता माळी, रवींद्र मोरे, ललित दळवे, विजय दळवे, कमल सोनवणे, सोमा मालचे, विजय वाघ, राजाराम वाघ, मारी मालचे, तनवी मोरे, चंद्रकला वाघ, अरुणा वाघ, आरती वाघ, प्रमिला वाघ, जिजाबाई वाघ, रामचंद्र सोनवणे, लता सोनवणे, चंदाबाई सोनवणे, रेणुका वाघ, मंगल धुळेकर, अरुणा सोनवणे, आशा माळी, किशोर राजपूत, ज्योती मोरे, सोनाली सोनवणे, अनिता सोनवणे, श्रद्धा भवरे, नंदा भवरे, नेहा शिंदे, रूपाली भवरे, अरुणा भवरे, प्रीती पवार, राहुल ठाकरे, सुलोचना सोनवणे, सोनू मालचे, संजय वाघ, सुधीर माळी, कमलेश माळी, राज चव्हाण, सागर माळी, लकी सोनवणे, वैभव सोनवणे, कृष्णा पवार, बॉबी सोनवणे, भूषण सोनवणे, प्रेम वाघ, बलराम नेवरे, दिनेश सोनवणे, प्रेम गायकवाड, शिवम सोनवणे, वैभव वळवी, राकेश गायकवाड, संगीता पवार, पुनम सोनवणे, जिभाऊ पवार, आरती मोरे, करण मोरे, राज मोरे, विजय मोरे, आशाबाई मोरे, संजय मोरे, सोनी मोरे, राजेंद्र धुळेकर, सोनू पवार, रतिलाल पवार, पूजा पवार, गणेश धुळेकर, करण वाघ, यश सोनवणे, नागराज माळी, दीपक मोरे, कुणाल मोरे, साहिल भवरे, नितीन महेश, विवेक जाधव, श्रीराम सोनवणे, सुभाष सोनवणे, बादल सोनवणे, शाम मोरे, परशुराम सोनवणे, अजय पवार, भाग्यश्री पवार, ऋषिकेश मोरे, अमोल दळवे, किरण दळवे, आदींच्या सह्या आहेत.
टीप : वरील सर्व आरोप हे संबंधित समाजाने प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील असून, त्याबाबत प्रशासनाकडून अधिकृत चौकशी व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

0 टिप्पण्या