संचालक मंडळाच्या विशेष सभेत बिनविरोध निवड; समर्थकांकडून जल्लोष
एल्गार मराठी न्यूज
धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लि., धुळेच्या चेअरमनपदी शंशाक विश्वासराव रंधे, तर व्हाईस चेअरमनपदी बापुराव अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या विशेष सभेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा प्राधिकृत अधिकारी राजेंद्र विरकर यांनी केली.
ग.स. बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राधिकृत अधिकारी राजेंद्र विरकर, सहाय्यक प्राधिकृत अधिकारी अमोल बेंडाईत तसेच मतदनीस नागेश पुकळे उपस्थित होते.
चेअरमन पदासाठी गटनेते निशांत रंधे यांचे बंधू शंशाक विश्वासराव रंधे यांच्या नावाचा अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जास प्रविण धनराज भदाणे यांनी सूचक, तर प्रकाश बच्छाव यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.
व्हाईस चेअरमन पदासाठी बापुराव अर्जुन पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या अर्जावर प्रशांत शरद बोरसे यांनी सूचक, तर योगेश यमाजी धात्रक यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.
दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने शंशाक रंधे यांची चेअरमनपदी, तर बापुराव पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे प्राधिकृत अधिकारी राजेंद्र विरकर यांनी जाहीर केले.
निवड जाहीर होताच रंधे समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी गटनेते निशांत रंधे, संजय शिंदे, सी. एन. देसले, बबन नगराळे, शिरीष बिरारीस, किरण बोरसे, योगेश धात्रक, निंबा माळी, चंद्रकांत सत्तेसा, अशोक पवार, संजय पवार, आबा बच्छाव, विनोद पाटील, आधार बोरसे, रविंद्र अहिरे आदी संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित नेतृत्वाकडून बँकेच्या कारभाराला नवी दिशा मिळणार का, याकडे आता सभासद आणि कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या