शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी दत्ता कर्चे



 बारामती, पुरंदर, वेल्हा आणि हवेली तालुक्यांची जबाबदारी; पदाधिकारी व शिवसैनिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

एल्गार मराठी न्यूज 

वृत्त प्रतिनिधी : पुणे

मुंबई : शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी दत्ता कर्चे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती, पुरंदर, वेल्हा आणि हवेली या तालुक्यांचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे राज्य संपर्क प्रमुख अनिल धमने पाटील आणि सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रशांत पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ओबीसी नेते तथा शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली दत्ता कर्चे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

नियुक्तीपत्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन मजबूत करत शिवसेना पक्षवाढीसाठी कार्य करावे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दत्ता कर्चे यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या